शाहीद कपूर दिसणार आता `अक्शन’ चित्रपटात

निर्माता असलेल्या प्रभूदेवाच्या चित्रपटात शाहीद कपूर काम करणार अशी खूप दिवसापासून चर्चा होती. तो `वांटेड’च्या पुढील भागात काम करणार असल्याचे समजले होते. पण या सर्व गोष्टीला शाहिदने स्पष्टपणे  नकार दिला.  कारण या चित्रपटात सलमान खान काम करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. त्यामुळे आता तो काम करणार नाही, असे वाटत असताना त्याने `नमक’ हा  प्रभूदेवाचा चित्रपट स्वीकारला असल्याचे समजते.

गेल्या काही दिवसापासून त्याची बॉलीवुडमध्ये रोमान्स करणारा नायक अशी त्याची प्रतिमा झाली आहे. त्यामुळे यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आता त्याला प्रभूदेवाच्या या चित्रपटाने संधी चालून आली आहे. त्याचा फायदा आगामी काळात तो  कितपत करून घेणार हे येणारा काळच ठरविणार आहे. `नमक’ या चित्रपटात शाहीद हा मध्यप्रदेशमधील तरस्काची भूमीका करणार आहे. या भूमिकेमुळे त्याला नवीन काही तरी करून दाखविण्याची संधी आली आहे.

बॉलीवुडमध्ये निर्माता असलेल्या प्रभूदेवाने गेल्या काही दिवसापासून त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांने निर्मिती केलेला `वांटेड’ हा चित्रपट चांगलाच चालला होता त्यानंतर काही दिवसापूर्वीच त्याच्या रावडी राठोड चित्रपटालाही प्रेक्षकानी डोक्यावर घेतले होते. त्यामुळे प्रभूदेवाच्या आगामी चित्रपटात शाहीद काम करणार असल्याने चित्रपट चांगलाच झळकेल अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही.

Leave a Comment