
पुणे, दि. २३ – गेल्या आठवड्यात जोरदार मुसंडी मारत मान्सूनने कोकण, विदर्भाबरोबरच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही हजेरी लावली होती. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. या पावसाने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या आठवड्यात पावसाने पूर्णत: दडी मारल्याने शेतकर्यांत चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, येत्या तीन-चार मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
