हॉलिवूडची प्रसिद्ध व ऑस्कर विजेती अभिनेत्री अँजेलिना ज्योली हिने सिरीयन निर्वासितांसाठी १ लाख डॉलर्सची देणगी दिली असल्याचे यूएन हाय कमिशनकडून जाहीर करण्यात आले आहे. ज्योली या कमिशनची विशेष दूत आहे. जागतिक निर्वासित दिनाचे निमित्त साधून ज्योलीने ही देणगी दिली आहे.
याविषयी बोलताना ज्योलीने सांगितले की जगात निर्वासितांची संख्या वाढती असून राजकीय अस्थिरता आणि बंडाळी, तसेच अपमानास्पद वागणुकीमुळे अनेकांना आपला देश सोडून अन्य देशांत आसरा घ्यावा लागतो आहे. जेथे अशांतता आहे त्या देशात आंतरराष्ट्रीय कम्युनिटीने मध्यस्ती करण्याची गरज आहे. बशर अल असादच्या कारर्कीर्दीत अनेक सिरीयन नागरिकांनी तेथील रक्तपाताला कंटाळून,जिवाच्या भीतीने लेबानन आणि तुर्कस्थानात आश्रय घेतला आहे.
ज्योली २००१ सालापासून युनायटेड नेशन्सच्या रिफ्यूजी एजन्सीची राजदूत म्हणून काम करते आहे.