
निर्माता असलेल्या प्रभूदेवाच्या चित्रपटात शाहीद कपूर काम करणार अशी खूप दिवसापासून चर्चा होती. तो `वांटेड’च्या पुढील भागात काम करणार असल्याचे समजले होते. पण या सर्व गोष्टीला शाहिदने स्पष्टपणे नकार दिला. कारण या चित्रपटात सलमान खान काम करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. त्यामुळे आता तो काम करणार नाही, असे वाटत असताना त्याने `नमक’ हा प्रभूदेवाचा चित्रपट स्वीकारला असल्याचे समजते.