बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात

सिंगापूर, दि. २२ – सिंगापूर येथे सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. मिश्र दुहेरीत  शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यांत वी.डीजू आणि ज्वाला गुट्टा या जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले. चीन तैपेई च्या हुंग तिंग शेम आणि पेन सिंग शींग या जोडीने भारतीय जोडीचा १३-२१, २१-१४, २१-१७ असा पराभव केला. भारतीय जोडीने पहिला गेम जिंकत विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या दोन्ही गेम्समध्ये चीन तैपेई च्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावत सामना खिशात टाकला.

Leave a Comment