`बिग बॉस-६’ मध्ये हॉट किम कारदिशिया?

`बिग बॉस’ या रिऍलिटी शोच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. अमेरिकेची वादग्रस्त सेलिब्रिटी किम कारदिशियान बिग बॉसच्या सहाव्या पर्वात येणार असल्याची चर्चा आहे. नेहमीच वादात अडकणार्‍या किमने नुकताच आपल्या नवर्‍याला घटस्फोट दिला आहे. तिचे क्रीस हम्प्रिसबरोबरचे लग्न केवळ ७२ दिवस टिकले.

जर किम `बिग-बॉस ६’ मध्ये सहभागी झाली, तर तो तिचा पहिला भारतीय टीव्ही शो असेल. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी तिने ४.५ कोटी रुपये मागितले आहेत. एंडमॉल इंडियाचे सीईओ दीपक धर म्हणाले, `बिग बॉसच्या साहव्या भागासाठी आम्ही अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींशी बोलणी करत आहोत. मात्र अजून काही नक्की ठरलेले नाही.’

नुकत्याच आपल्या रिऍलिटी शोमध्ये किमने भारतीय अन्नाला नावे ठेवली होती. तिला भारतीय अन्न आवडत नसल्याचे म्हणताच ट्विटरवर तिच्यावर बरीच टीका करण्यात आली होती.

Leave a Comment