आषाढीयात्रेसाठी ५० लाखांची सुटी नाणी

पंढरपूर,दि.२२   सध्या सुटया नाण्यांची तीव्र टंचाई जाणवत असून काही जणांकडून आषाढीयात्रेच्या काळात सुटया नाण्यांचा काळाबाजार केला जातो हे लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया व मंदिर समितीने व्यापार्‍यांसाठी ५० लाख रूपयांची सुटी नाणी उपलब्ध करून दिली आहेत.

आषाढीयात्रेनिमित्त पंढरपुरात १० ते १२ लाख भाविक येतात त्यांच्याकडून विविध वस्तुंची खरेदी होताना सुटया नाण्यांची गरज भासते. विक्रेत्यांना सुटी नाण्यांची चणचण भासू नये यासाठी व्यापारी महासंघ, ग्राहक पंचायत यांनी आषाढीयात्रेच्या निमित्ताने ५० लाख रूपयांची सुटी नाणी पुरवावीत अशी मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक पंढरपूर शाखेकडे १० लाख रूपयांची सुटी नाणी पाठविली आहेत. स्टेट बँकेने त्यांच्याकडील १५ लाखांच्या सुटया नाण्यांची भर घालून एकूण २५ लाखांची सुटी नाणी उपलब्ध करून दिली आहेत.

Leave a Comment