शाहीद आफ्रिदी घेणार क्रिकेटमधून संन्यास

पाकिस्तान संघाचा आधार असलेला धडाकेबाज फलंदाज शाहीद आफ्रिदी २० ट्वेन्टी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी एकदिवसीय क्रिकेट संघातून निवृत होण्याचा विचार करीत आहे. त्याच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मात्र चिंतीत आहे. त्याने संन्यास घेण्यापूर्वी परत एकदा विचार करावा असे मत काही जणांनी व्यक्त केले आहे.

यापूर्वी एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या गलथानपणाला कंटाळून त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र त्याच्या मागण्या बोर्डाने मंजूर केल्याने पुन्हा त्याने खेळण्याचा निर्णय घेतला होता. आफ्रिदी म्हणाला की, गेल्या काही दिवसापासून माझी एकदिवसीय सामन्यातील कामगिरी जर चांगली होत नसेल तर मला क्रिकेटमधून संन्यास घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याबाबत काही वरिष्ठ खेळाडूशी बोलणी करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.

आगामी विश्वचषकाची तयारी करण्यासाठी व संघात युवा खेळाडूना स्थान देण्यासाठी मी अशा स्वरुपाचा निर्णय घेत असल्याचे त्याने म्हटले आहे. यापूर्वीच त्याने कसोटी संघातून निवृती पत्करलेली आहे. आता एक दिवशीय सामन्यातून निवृत होणार असल्याने पाकिस्तान संघासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. काही दिवसापासून पाकिस्तान संघाच्या कर्णधार पदावरून हटविल्यानंतर तो संघ व्यवस्थापनावर नाराज होता. त्यामुळेच त्यांने श्रीलंका दौरा संपल्यानंतर निवृत होण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment