रेन्नोची एस यू व्ही डस्टर जुलैत बाजारात

फ्रेंच कारमेकर रेनॉल्ट (रेनाँ) यांनी त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही डस्टर सप्टेंबर-आक्टोबर ऐवजी जुलैतच भारतीय बाजारात उतरविण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.. विशेष म्हणजे बाजारात येण्यापूर्वीच १ हजार डस्टरची नोंदणीही झाली असल्याचे समजते.

जागतिक कार उत्पादकात भारतीय बाजारात आणली गेलेली ही पहिली  कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून तिच्या किमतीही अत्यंत स्पर्धात्मक ठेवण्यात आल्या आहेत. याचे पेट्रोल व्हर्जन सात लाख रूपयांपासून तर डिझेल व्हर्जन आठ लाख रूपयांपासून उपलब्ध असून १२ लाख रूपये त्यांची अंतिम किंमत आहे. ४.३ मीटर लांबीच्या या एसयूव्हीची दीर्घकाळ ग्राहकांना प्रतीक्षा होती. तुलनेने किमती कमी असल्याने त्याला भारतीय ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा असल्याचे कंपनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

रेनॉल्टच्या पल्स हचबॅक, फ्ल्यूमस सेदान व कोलिओ एसयूव्ही या यापूर्वीच्या गाड्यांना भारतीय बाजारात फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र पाच सीटर डस्टर  कॉम्पॅक्ट एसयूव्हीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असल्याने आक्टोबरची वाट न पाहताच जुलैतच ती बाजारात उतरविर्‍याचा निर्णय घेतला गेल्याचे कंपनीचे प्रवक्ता राजीव मित्रा यांनी सांगितले.

Leave a Comment