
व्हेंडिग मशीनमधून चहा,कॉफी,चॉकलेटे मिळणे ही अपूर्वाई राहिलेली नाही. पुण्यात तर मधमाशी पालन केंद्रात व्हेंडिग मशीनमधून मधही मिळत असे. अमेरिकेतील एका बेकरी समुहाने कप केक सर्व्ह करणारे व्हेंडिग मशीन सुरू कले असून हे जगातील पहिलेवहिले केक व्हेंडिग मशीन आहे. त्यामुळे आता रात्री अपरात्री भुकेने कासावीस झाला असाल तर या मशीनमधून ताजे ताजे, तुमच्या पसंतीचे केक तुम्हाला उपलब्ध होऊ शकणार आहेत.