इस्लामाबाद,दि. १९ – प्रसिद्ध पाश्तो गायिका गझाला जावेद आणि त्यांच्या वडिलांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. पेशावर शहरात सोमवारी रात्री ही घटना घडली. या हल्ल्यात जावेद यांची लहान बहिण फरहत बिबी बचावल्या आहेत.

सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, दबगारी बाजार या परिसरातील एका ब्यूटी पार्लरमधुन निघाल्यानंतर हल्लेखोराने गझाला जावेद यांच्यावर गोळीबार सुरु केला. वडील मोहम्मद हे त्यांच्यासोबतच होते. गोळीबारात दोघांचाही मृत्यू झाला. हल्लेखोर एका मोटरसायकलवर आले होते. या गुन्ह्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये खैबर भागात अनेक गायक आणि संगीतकारांची स्थानिक तालिबानी दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जणांनी या भागातून पलयान केले आहे.
गझाला जावेद या दोन वर्षांपूर्वी जहांगिर खान यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या होत्या. परंतु, आपसी मतभेदानंतर त्यांनी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून त्या वडिलांसोबत राहत होत्या. पतीसोबतचा वाद त्यांच्या हत्येमागे कारणीभूत आहे काय, या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.