पंतप्रधान हिदुत्ववादी पाहिजेत; संघाची नितीशकुमारना चपराक

नवी दिल्ली दि.२०- हा देश हिदुंचा असल्याने या देशाचा पंतप्रधान हा हिंदूच असला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना चपराक लगावली. आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबाच दिला.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदींना लक्ष्य करीत  नितीशकुमार यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी एनडीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार हा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे असे म्हटले होते. त्याला संघाने बुधवारी सडेतोड उत्तर दिले. संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला. हा देश हिदूंचा असल्याने पंतप्रधानही हिंदूच हवा, असा टोला नितीश कुमार यांना मारला.

हिंदुत्वाची विचारप्रणाली कायमस्वरूपी टिकवायची असेल तर, हिंदू समाजाने संघटित झाले पाहिजे. या विचारप्रणालीवर विश्वास असणारी व्यक्तीच पंतप्रधान असली पाहिजे, असेही भागवत म्हणाले. एका इंग्लिश दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत नितीश कुमार यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी एनडीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार हा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे असे म्हटले होते.

Leave a Comment