ऑलिम्पिकमध्ये तंदुरूस्त असणे गरजेचे – सायना

हैदराबाद, दि. २० – सतत दोन विजेतेपद जिंकल्यानंतर आत्मविश्‍वासाने तरबेज असलेली भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने आज म्हटले की, पुढच्या महिन्यात होणार्‍या ऑलिम्पिक खेळात चीनच्या शक्तीशाली खेळाडूंच्या सामना करण्यासाठी तिला आत्मविश्‍वासाव्यतिरिक्त शारीरिक रूपाने मुख्यस्थानी रहावे लागेल.

सायनाने या महिन्यात बँकॉकमध्ये थायलंड ओपन ग्रां प्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर मागच्या अठवडी जकार्तामध्ये इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद जिंकले. या स्टार भारतीय खेळाडूने म्हटले की, हा विजय यापेक्षा चांगल्या स्थितीत येऊ शकत नव्हते आणि तिची लंडन खेळात पदक जिंकण्याची अपेक्षा पुन्हा एकदा वाढली.

आंध्रा प्रदेश खेळ मंत्रालयाद्वारे येथे पुलेला गोपीचंद ऍकडमीत आयोजित सन्मान सोहळ्यात सायनाने म्हटले, `मला ऑलिम्पिकपूर्वी खुप मेहनत करण्याची गरज असून बँकॉक व जकार्तामधील विजयाने माझे मनोबल वाढले आहे. तिसर्‍यांदा इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद जिंकुन मी खुप आनंदी आहे.’

पुढच्या महिन्यात होणार्‍या खेळाच्या महाकुंभ तयारीविषयी विचारल्या असता जगातील पाचव्या क्रमांकाची खेळाडू सायनाने म्हटले, ’ऑलिम्पिकसाठी आमचा विशेष कार्यक्रम राहील. हे चार ते पाच आठवडे माझ्यासाठी कठोर असतील. यामुळे ऑलिम्पिकपूर्वी शारीरिक रूपाने तंदुरूस्त व जखमीमुक्त असणे महत्त्वपूर्ण आहे कारण तेथील कोर्ट मंद असतील.’

सायनाने इंडोनेशिया ओपनमध्ये विजेतेपद प्रवासादरम्यान उपांत्यपूर्व फेरीत जगातील चौथ्या क्रमांकाची खेळाडू चीनची शियान वेंग व अंतिम लढतीत चीनचीच जगातील तिसर्‍या क्रमांकची खेळाडू शुएरुई ली ला मात दिली होती.

Leave a Comment