सोने भडकले

नवी दिल्ली दि.१९- मंगळवारी गोल्ड फ्यूचर किंमती अचानक वाढल्याने सोन्याने ३०,३८८ रूपयांची पातळी गाठली.गोल्ड फ्यूचर फंडातून सोने घेणार्‍यांना ज्या सोन्याची डिलिव्हरी ऑगस्टमध्ये मिळणार आहे, त्या सोन्याचा दर ३०,३८८ वर गेला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये घेतलेले हे सोने आहे. हे दर आज सकाळीच ७७ रूपयांनी वाढले आहेत. जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात २ डॉलर्सची वाढ नोंदविली गेली आहे.
 
जागतिक मंदीमुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोन्यातील गुंतवणुकीला अधिक महत्त्व दिल्याने ही दरवाढ होत असल्याचे बाजारतज्ञांचे मत आहे.