
गेल्या काही दिवसापासून चित्रपट अभिनेता अक्षय कुमार बराच व्यस्त दिसत आहे. त्याच्या घरी काही दिवसातच नवा पाहुणा येणार आहे. त्यामुळे सध्या अक्षय व ट्विंकल कमालीचे खुश आहेत. दोघेही दुसऱ्या मुलाच्या स्वागताची जोरदार तयारी करीत आहेत. या दोघासोबतच त्यांचा मुलगा अर्णव हा देखील तयारी करीत असल्याचे समजते. ट्विंकलची डिलेव्हरी सप्टेंबर महिन्यात होणार असल्याने सध्या घरची सजावट करण्यात येत आहे.