धोनी पोहचला नेपाळला

नुकतीच जम्मू काश्मीर मधील भारतीय सैनिकाची भेट घेऊन झाल्यानंतर येथील दौरा आटपून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या प्रसारासाठी आता नेपाळची राजधानी काठमांडूला पोहचला आहे. या ठिकाणी तो काही क्रिकेटपटूंची भेट घेणार आहे. येथील काही खेळाडूना तो प्रशिक्षण देणार असल्याचे समजते.

येथील त्रिभुवन या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्यानंतर पत्रकरांशी  बोलताना धोनी  म्हणाला की,  देशाचे नाव उज्ज्वल करायचे असेल तर युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अभ्यासासोबतच युवकांनी खेळाला प्राधान्य दिल्याने देशाची प्रतिष्ठा वाढते.

धोनी म्हणाला की भविष्यात नेपाळचा संघ पुढे यावा यासाठी सर्वानी पुढे यायला हवे.  येथील युवकांना एका लोकप्रिय टीमचे प्रदर्शन करतांना पहाण्यास मला आवडेल. यावेळी तो नेपाळ मधील निवडक क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देणार आहे. त्याशिवाय येथील काही खेळाडूना काठमांडू येथील हॉटेल मध्ये प्रशिक्षणाचे धडेही तो देणार आहे.  तो त्याच्या येथील चाहत्यांची आवर्जून भेट घेणार आहे. येथील प्रसिद्ध असलेल्या पशुपतीनाथ मंदिरात दर्शनासाठी धोनी जाणार असल्याचे समजते.

Leave a Comment