ऑलिम्पिकमध्ये दोन संघ पाठवू शकतात तर एक का? : माकन

नवी दिल्ली, दि. १९ – क्रीडामंत्री अजय माकन यांनी अखिल भारतीय टेनिस संघ (एआयटीए) च्या ऑलिम्पिकसाठी लियंडर पेस व महेश भूपतीची जोडी बनवण्याच्या निर्णयावर प्रश्‍न विचारला आहे. पेस व भूपती मतभेद असल्यामुळे पूर्वी देखील आपली जोडी तोडली असून माकन म्हणाले की, जेव्हा देश स्पर्धेसाठी दोन संघ पाठवू शकतो, तर फक्त एक संघ पाठवण्यावर जोर का दिला जात आहे. माकन यांनी सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर आपल्या पोस्टमध्ये लिहिले, `आम्ही दोन संघ पाठवु शकतो तर मग एक का पाठवावे. प्रश्‍न हा आहे की, सानियासोबत जोडी कोन बनवेल. ग्रँड स्लॅम मिश्र दुहेरी जोडीला का छेडले जावे.’

एआयटीएने ऑलिम्पिकमध्ये प्रतिधिनित्व करण्यासाठी पेस व भूपतीच्या जोडीला निवडले आहे परंतु भूपतीने नंतर स्पष्ट केले की, तो आपल्या माजी साथीसोबत जोडी बनवण्यास तयार नाही. एटीपी दुहेरी रँकिंगमध्ये मुख्य १० मध्ये समाविष्ट असल्यामुळे पेसला आपला जोडीदार निवडण्याचा हक्क आहे. दुसरीकडे भूपती आपल्या सध्याचा जोडीदार रोहन बोपन्नासोबत सामूहिक रँकिंग असल्यामुळे ड्रॉ मध्ये संघ रूपात जागा बनवु शकतो. भूपतीने जोर देऊन सांगितले की, त्याची जोडी बोपन्नासोबत बनवली जावी ज्यासोबत त्याने ऑलिम्पिकला लक्षात ठेवुन सत्राच्या सुरूवातीत जोडी बनवली होती.

Leave a Comment