आता अंतराळात माधुरीच्या नावाचा तारा चमकणार

बॉलीवुडमध्ये आपल्या हास्यमुखाची चमक पसरविल्यानंतर आता माधुरी दीक्षित आकाशातही चमकेल. त्यांच्या चाहत्यांनी ओरियन कॉन्स्टलेशनच्या एक तार्‍याचे नाव माधुरी दीक्षित ठेवले आहे. ४५ वर्षीय धक-धक गर्ल माधुरी या भेटीवर खुप आनंदी आहे.

तिने ट्विटरवर लिहले, मी आपल्या चाहत्यांचे आभार व्यक्त करू इच्छिते. त्यांनी एक तारा माझ्या नावे केला आहे. माधुरी सध्या लहान पडद्यावर डान्स रियलिटी शो झलक दिखला जा ची अध्यक्षता करीत आहे. शो च्या सेट वरच एम्प्रेस फॅनपेज नावाच्या संस्थेच्या १३ सदस्यांनी त्यांना भेटून त्यांना स्टार सर्टिफिकेट भेट केले. यापूर्वी अभिनेता शाहिद कपूरच्या चाहत्यांनी ओरियन कॉन्स्टलेशनचा तारा त्याच्या नावावर केला होता. ही भेट शाहिदला यावर्षी फेब्रुवारीत त्याच्या वाढदिवसावर भेटली होती.

यापूर्वी न्यूयॉर्क स्थित संस्था इंटरनॅशनल लूनर जियोग्राफिकल सोसायटीने चंद्राचे एक लूनर क्रेटरचे नाव बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खानच्या नावावर ठेवले होते. माधुरी दीक्षितने स्टार फाउंडेशन नावाच्या संस्थेद्वारे दिलेल्या सर्टिफिकेटचे छायाचित्र ट्विटरवर टाकले आहे. यात सांगण्यात आले की, एक तारा तिच्या नावावर करण्यात आला आहे. स्टार फाउंडेशनच्या वेबसाइटनुसार इंटरनॅशनल एस्ट्रोनॉमिकल युनियनकडे अनेक तारांना नावे नाहीत फक्त नंबर आहे.

अमेरिकेत स्थित या संस्थेनुसार जो व्यक्ती एखाद्याचे नाव एक तार्‍याला देऊ इच्छितो तो त्यांच्याकडून खरेदी करू शकतो. वेबसाइटनुसार तार्‍याचे नाव देण्याचे स्वस्त दर ४० डॉलर (सुमारे २२११ रुपये) आहे. वेबसाइटवर या सेवेचा उपयोग केलेल्या हजारो लोकांची यादी देखील समाविष्ट आहे.

Leave a Comment