९ वर्षीय मुलीने ब्लॉग लेखनातून उभारला ५० लाखांचा निधी

लंडन, दि. १८ – स्कॉटलँडची अवघी नऊ वर्षाची मुलगी मार्था पेयन हिने शाळेत मिळणार्‍या आहारावर केलेल्या आपल्या ब्लॉगलेखनातून २४ तासातच एक लाख डॉलर म्हणजेच ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देणगीसाठी गोळा केली.

आगल येथील रहिवासी मार्था पेयन शाळेत मिळणार्‍या आहारावर एक ब्लॉग लिहित होती आणि ते लेखन तीस लाखांहून जास्त लोकांनी वाचले व पसंत केले होते.
सुरूवातीला अधिकार्‍यांनी आक्षेप घेत त्यावर बंदी घातली. मात्र नंतर चहुबाजूंनी टीका होऊ लागल्याने ही बंदी उठविण्यात आली. मार्थाच्या ब्लॉगला जगभरातून लाखो हिट्स मिळत आले आहेत.

मार्थाच्या ब्लॉगवर लाखो लोकांनी येणे आणि दान देणे याचा अर्थ ते मालावी येथील एका शाळेत किचन सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देऊ शकतील. तसेच ते एका वर्षासाठी मालावीच्या दोन हजार विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या खर्चाशिवाय दुसर्‍या विकसनशील देशातील सुमारे ४,००० विद्यार्थ्यांचाही खर्च उचलणार आहेत.

मार्थाने आपल्या लॉचगिलप्हेड प्रायमरी स्कूलमध्ये मिळणार्‍या जेवणाची छायाचित्र आपल्या ब्लॉगवर ३० एप्रिलपासून प्रकाशित करण्यास सुरूवात केली होती. तिने दररोज शाळेत मिळणारे जेवण मोजण्यासाठी एक खासप्रकारचे मीटर बनविले होते आणि त्याला आरोग्यानुसार रेटिंग करीत असे.

Leave a Comment