सुष आणि कमल हसन झाले चांगले दोस्त

चित्रपटसृष्टीत कधी कोण कोणाचा दोस्त होतो व कधी कोण कुणाचा दुश्मन होतो हे सांगणे कठीण आहे.  अभिनेता कमल हसन व अभिनेत्री सुश्मिता सेन या दोघांमध्ये आडवा विस्तुही जात नव्हता. पार्टीमध्ये चुकून दोघाची भेट झाली, तर दोघेही बोलणे तर लांबच राहिले एकमेकाकडे साधे पाहत ही नव्हते.

मात्र गेल्या काही दिवसापासून दोघांनीही झाले गेले विसरून पुन्हा सुष आणि कमल हसन चांगले दोस्त झाले आहेत. यांच्या दोस्तीचे कारण मात्र या दोघांचे चित्रपट आहेत. सुश्मिता सेन `राणी लक्ष्मिबाई’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या कामात सध्या व्यस्त आहे, तर दुसरीकडे कमल हसन हा `मर्मयोगी’ हा चित्रपट तयार करीत आहे. `राणी लक्ष्मिबाई’ या चित्रपटासाठी कमल हाच उत्तम मार्गदर्शक ठरू शकतो, हे लक्षात आल्याने तिने त्याच्या सोबत दोस्ती केली असल्याचे समजते.

कमल हसन ज्यावेळी मुंबईमध्ये येत असतो त्यावेळी तीच्या ती घरी जाते. एव्डेच नव्हे तर हसनच्या मुली सोबत सुशने चांगलीच  मैत्री केली आहे. ती त्यांच्याकडून तेलगु भाषा शिकत असल्याचे समजते. कमलला एसएमएस करायचा असेल, तर सुष तेलगु मध्येच करत असून दिवसेंदिवस दोघातील  मैत्री आणखीनच दृढ होत चालली आहे.

Leave a Comment