रितेश करतोय मराठी चित्रपट

हिंदी चित्रपट क्षेत्रात अभिनयाने वेगळा ठसा उमटविणारा अभिनेता रितेश देशमुख आता मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रितेश देशमुख स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून हा नवीन चित्रपट तयार करणार आहे. त्याच्या नवीन चित्रपटाचे नाव `नटरंग’ असे ठरले आहे. दिग्दर्शक रवी जाधव त्याच्या या नवीन चित्रपटाच्या दिग्दर्शनचे काम करणार आहे.

चित्रपटाच्या निर्मितीबाबतीत दोघेही पूर्वी अनेकवेळा भेटले असून त्यानी याबातीत आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण केली आहे. सध्या रितेश दोन हिंदी चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. गेल्या काही दिवसापासून अभिनया सोबतच चित्रपट निर्मिती करण्याकडे रितेशने अधिक लक्ष दिले आहे. एक आव्हान म्हणून रितेश मराठी चित्रपटाची निर्मिती करीत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. फार पूर्वीपासूनच मराठी चित्रपटाची निर्मिती कारण्याचे त्याचे स्वपन आहे. या निर्मिती क्षेत्रात तो यशस्वी झाल्यानतर तो  हिंदी चित्रपट निर्मितीकडे वळणार असल्याचे समजते. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर आलेला अनुभव पुढील काळासाठी त्याच्यासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याने तो निर्मीतीकडे वळला असल्याचे समजते.

त्याच्याकडील सध्या असलेल्या दोन चित्रपटाचे चित्रीकरणाचे काम संपल्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला तो या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार आहे. याबाबत रितेशसोबत मात्र बोलणे झाले नाही.

Leave a Comment