`फादर्स डे’ निमित्ताने आमिर म्हणतो मी परफेक्ट ’पिता’ नाही

मिस्टर परफेक्शनिस्ट नावाने प्रसिद्ध असलेला लोकप्रिय अभिनेता आमिर खान स्वत:ला परफेक्ट पिता समजत नाही. `फादर्स डे’  निमित्ताने याचा खुलासा केला. जेव्हा आपण कामावरून घरी येतो आणि आपली वाट पाहत असलेली मुले आपल्या बाहुपाशात येतात, तो क्षण असा असतो की त्याची तुम्ही कशाशीही तुलना करू शकत नाही. मुलांच्या या कृतीमुळे कामाचा सर्व ताण लगेच निवळतो.

गेल्यावर्षीच्या अखेरीस पुन्हा एकदा पिता बनलेला आमिर `फादर्स डे’ हा दिवस वडीलांसाठी आठवणीचा करावा यावर विश्‍वास ठेवत नाही. आमिर आणि किरण रावला गेल्यावर्षी एक मुलगा झाला असून, त्याचे नाव त्यांनी आझाद राव खान ठेवले आहे. आमिरला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. जुनैद आणि इरा अशी त्यांची नावे आहेत.

लंडनमध्ये भारतीय वशांचे खासदार कीथ वाज यांच्या कार्यक्रमानिमित्त गेलेल्या अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत आपण वडीलांची जबाबदारी पूर्णपणे निभावू शकत नसल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, `मी माझ्या मुलीला वेळ देऊ शकत नाही, हे चुकीचे आहे. मी तिची नॅपी बदलू शकत नाही. ऐश्‍वर्या ही सर्व कामे करते. ती मुलीसाठी खूप कष्ट घेते.’

सोनम कपूरने आपले पिता अभिनेते अनिल कपूर यांना वास्तविक जीवनातील हिरो असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment