
ग्रीसमधील संसदेच्या निवडणुकीत दक्षिणपंथी न्यू डेमोक्रॅटिक आघाडी विजयी होण्याच्या शक्यतेने आशियचा बाजार तेजीत आला आहे. आशियाशिवाय जपान व ऑस्ट्रेलिया येथिल सेन्सेक्स सुद्धा वाढला आहे.
ग्रीसमधील संसदेच्या निवडणुकीत दक्षिणपंथी न्यू डेमोक्रॅटिक आघाडी विजयी होण्याच्या शक्यतेने आशियचा बाजार तेजीत आला आहे. आशियाशिवाय जपान व ऑस्ट्रेलिया येथिल सेन्सेक्स सुद्धा वाढला आहे.
भारतीय बाजारसुद्धा सध्या तेजीत आहे. मात्र भारतीय रिझर्व्ह बँक काय घोषणा करणार यावर बाजार अवलंबून राहणार आहे. या निवडणुकीत पाहिल्यादा वामपंथी आघाडीला बहुमत मिळेल असे वाटत होते पण दक्षिणपंथी न्यू डेमोक्रॅटिक विजयी होण्याच्या शक्यतेने पुन्हा बाजार तेजीत आला आहे. जे कर्ज ग्रीसला देण्यात आले आहे ते मिळणार की नाही याबद्दल चिंता वाट होती. त्यामुळे युरोपच्या अर्थ व्यवस्थवर त्याचा परिणाम होणार होता. मात्र दक्षिणपंथी न्यू डेमोक्रॅटिकने युरोपीय संघ व आंतरराष्ट्रीय मदत निधीने जी मदत दिली आहे त्याचे आम्ही समर्थन करीत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या घोषणेमुळे सर्वाना काहीअंशी दिलासा लाभला आहे.
ग्रीस येथील संसदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी जेव्हा आशियचा बाजार सुरु झाला त्यावेळी काही काळ सूचकांक तेजीत आला होता. आशियाशिवाय जपान, दक्षीण कोरियाचा सूचकांक २.१ टक्क्यानी तर ऑस्ट्रेलिया येथिल सेन्सेक्स सुद्धा १.५ टक्क्यानी वाढला आहे. दुसरीकडे बाजरात डॉलरच्या तुलनेत युरोचे दर १ टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीसी वाढ झाली आहे