जयपूर दि.१८- वारंवार सूचना देऊनही मुलगी अनेक पुरूषांशी संबंध ठेवते यामुळे चिडलेल्या बापाने मुलीचा तलवारीने शिरच्छेद केल्याची भीषण घटना राजस्थानातील जयपूर जवळच्या राजसमंद जिल्ह्यात रविवारी घडली.
ऑनर किलिंगमधून बापाने केला मुलीचा शिरच्छेद
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार ओंकारसिंग याने आपल्या वीस वर्षाच्या मुलीचा तलवारीने शिरच्छेद केला आणि तो तिचे मुंडके घेऊन गावातील रस्त्यातून फिरत असताना स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात नेले. तेथे ओंकारसिंगने त्याची मुलगी मंजू अनेक पुरूषांशी संबंध ठेवते, वारंवार सांगूनही ऐकत नाही म्हणून तिला ठार केल्याचा जबाब दिला. ओंकारसिंगच्या घरातून मंजूचे शव पोलिसांनी हलविले आणि ओंकारसिंगला अटक केली असल्याचे समजते.