दर्जेदार मराठी चित्रपटांच्या बाबतीत ओरड होत असतानाच आता मराठी चित्रपटांना हिंदीत बरीच मागणी वाढत चाललेली दिसून येत आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या २१ पुरस्कार विजेत्या ‘गजर’ या चित्रपटालाही हिंदीत डब करण्याचा ध्यास निर्माते सुनील खोसला यांनी केला आहे. येत्या काही दिवसांतच हा चित्रपट नव्याने हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
वारीचा ‘गजर’ आता हिंदीत
कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या पंढरीच्या वारीचे महत्त्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे, यासाठी सुनील खोसला यांनी `गजर’ या चित्रपटाचे हिंदीत ‘मोक्ष-जर्नी ऑफअ द सोल’ या नावाने प्रदर्शित करण्याचे ठरविले आहे. याबाबत खोसला म्हणाले, `गजर’ या चित्रपटाच्या कथेचे मला मुख्य आकर्षण आहे. या चित्रपटाच्या कथानकात काहीच बदल न करता हिंदी प्रेक्षकांपर्यंत वारीचे महत्त्व पटवून देण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आम्ही कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यात कोणताही बदल केलेला नाही.
