रावडी राठोडची कमाई १०० कोटी पेक्षा अधिक

रावडी राठोड हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करीत असून आतापर्यंत या चित्रपटाने १०० कोटी पेक्षा जास्त रुपायांची कमाई केली आहे.  या चित्रपटाच्या टीमने या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी नुकतेच एका पार्टीचे आयोजन केले होते.

आतापर्यंत रावडी राठोड या  चित्रपटाने ११४ कोटीपेक्षा अधिक रुपायांची कमाई केली आहे. या य यशाबद्दल दिग्दर्शक प्रभू देवा खूप खुश आहे. कारण की त्याच्या आत्तापर्यंतच्या दोन्ही चित्रपटाने १०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. तो आता तिसऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्यास भीत आहे, कारण  आता प्रेक्षकांना त्याच्या या येणाऱ्या चित्रपटाकडून तशाच अपेक्षा असणार आहेत. यापूर्वीचा त्याचा वांटेड हा चित्रपट असाच यशस्वी ठरला होता. या निमित प्रभू देवाने ताज हॉटेल मध्ये सर्व टीमसाठी पार्टीचे आयोजन केले होते.

या पार्टीमध्ये अभिनेता अक्षयकुमार व अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सहभागी झाले होते. सोनाक्षीचा हा दुसरा यशस्वी चित्रपट आहे. यापूर्वीचा तिचा दबंग हा चित्रपट यशस्वी झाला होता. सोनाक्षी या वेळी प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हणली की मी यशामुळे भारावून गेले आहे. आगामी काळात माझे चित्रपट यशस्वी व्हावेत असे मला वाटते.या पार्टीत सर्वासोबतच चित्रपटाचे निर्माते संजय लीला भंसाळी व सिद्धार्थ कपूर सहभागी झाले होते.

Leave a Comment