बंगळुरू दि.१७- महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले स्वामी नित्यानंद आणखी एका वादात अडकले आहेत.
नित्यानंद नव्या वादाच्या भोवर्यात
जिल्हा प्रशासन आणि पोलिस यांनी संयुक्तपणे केलेल्या आश्रमातील चौकशीमध्ये अध्यात्मिक गुरूच्या खासगी खोलीत डबल बेड, वातानुकुलित यंत्रणा, ट्रेडमिल, एलसीडी टिव्ही, लॉकर, महत्वाचे दस्तावेज आणि डंबेल्स अशा वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चौकशीत खासगी डिस्पेंसरीही आढळून आली असून त्यात अॅलोपॅथी औषधे सापडली आहेत.