इराकमध्ये बॉम्ब स्फोट; ३२ यात्रेकरू ठार

बगदाद दि.१७- येथील शिया पंथाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून रविवारी केलेल्या दोन स्वतंत्र कार बॉम्ब स्फोटांत ३२ यात्रेकरू ठार तर, ६९ जण जखमी झाले आहेत.

अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, पहिला हल्ला वायव्य इराकच्या शूला जिल्ह्यात शिया पंथाच्या दुपारी निघालेल्या धार्मिक मिरवणुकीत अडकलेल्या कारमध्ये बॉम्ब स्फोट झाला. त्यात १४ जण ठार तर ३४ जखमी झाले. दुसरा हल्ला किधमिया जिल्ह्यात शियांच्या धार्मिक स्थळी झाला.त्यात १८ जण ठार झाले.

Leave a Comment