धोकेबाज पेस सोबत खेळण्यास भूपतीचा नकार

भारतीय टेनिस असोसिएशनने पुढील महिन्यात लंडनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. त्यामध्ये डबलसाठी लिंअडर पेस व महेश भूपती या जोडीची निवड केली आहे.  एका  ठिकाणी मुलाखत देताना महेश भूपतीने मात्र आगामी काळात धोकेबाज लिंअडर पेस सोबत खेळण्यास नकार दर्शविला आहे.

पुढच्या महिन्यात होणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी महेश हा रोहन बोप्पाना सोबत खेळण्यास उत्सुक आहे. मात्र भारतीय टेनिस असोसिएशन महेशने पेस सोबतच खेळावे म्हणून प्रयत्न करीत असल्याचे समजते. काही दिवसापूर्वीच महेशची ही  मागणी भारतीय टेनिस असोसिएशनने फेटाळून लावली होती. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय टेनिस असोसिएशनला दोन जोडया पाठवण्याचे अधिकार आहेत, मात्र पेस सोबत खेळण्यास महेश अथवा रोहन दोघे तयार नसल्याने इच्छा असूनही या स्पर्धेसाठी भारताला दुसरी जोडी पाठवता येत नाहीं. या सर्व घडामोडीमुळेच भारतीय टेनिस असोसिएशनने एकच जोडी पाठविण्याचा  निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या चार स्पर्धेतही महेश व पेस मध्ये मतभेद असनाही दोघे एकत्र खेळत आहेत. त्यामुळे या ऑलिम्पिक स्पर्धेत दोघेही एकत्र खेळतील असा विश्वास भारतीय टेनिस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महेशच्या सरावासाठी असोसिएशन महिन्याला ६ हजार डॉलर्स खर्च करते त्यामुळे तो या स्पर्धेत खेळणार असल्याचेही या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले

Leave a Comment