अण्णा हजारे यांचा ब्रिटीश संसेदत सन्मान

राळेगण सिद्धी दि.१६- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा ब्रिटीश संसदेत येत्या १७ जुलैला फेन्नर ब्रॉकवे पदक देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

भारत व ब्रिटन यांच्यात परस्पर सामंजस्य वाढविण्याचे काम करणार्‍यांना हे पदक मजूर पक्षाच्या लेबर फ्रेंडस ऑफ इंग्लंड संस्थेतर्फ देण्यात येते.यापूर्वी हा सन्मान इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि माजी परराष्ट्र मंत्री जॅक स्ट्रा यांना देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटीश संसद सदस्य बॅरी गार्डिनर यांनी अण्णा हजारे यांना १६ मे रोजी हे पदक स्वीकारण्यासाठीचे अधिकृत निमंत्रण पत्राने पाठविले होते आणि अण्णांनी ते स्वीकारले होते. पदक स्वीकारल्यानंतर अण्णा त्यांनी देशात चालविलेल्या जनलोकपाल आंदोलनाबद्दलची माहिती ब्रिटीश संसदेत देणार आहेत.

Leave a Comment