सोन्याची भरारी – दहा ग्राम साठी ३०,५७० रुपये

नवी दिल्ली,दि. १५ -साठेबाजांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे शुक्रवारी सोन्याने दिल्लीच्या सराफा बाजारात प्रति तोळा २० रुपयांनी वाढून ३०,५७० या नव्या उच्चांकी पातळीवर भरारी घेतली आहे.

मुंबईच्या बाजारातही सोन्याने नव्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. सराफा बाजारामध्ये स्टँडर्ड सोन्याच्या किमती प्रति तोळा २५ रुपयांनी वाढून ३०,०२५ रुपयांवर गेल्या. तर शुद्ध सोने २० रुपयांनी वाढले आणि ३०,१६५ अंकांवर बंद झाले. चांदीच्या किमती मात्र प्रति किलो ३१० च्या घसरणीने ५५,२००पर्यंत खाली आल्या.

दिल्लीत सोन्याने सलग सहा सत्रात वाढ नोंदवली असून भाव १०५० रुपयांनी वधारला आहे. त्याचवेळी सोन्यासमोर चांदीची लकाकी मात्र कमी पडली. चांदीच्या किमती प्रतिकिलो ९७० रुपयांनी घसरून ५४,७३०वर बंद झाल्या. लग्नसराईचा जवळ येणारा काळ आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेत यामुळे खरेदीचा जोर वाढल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

Leave a Comment