मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यामुळे येते बहिरेपण

सिडनी दि.१५ -आयपॉडवर मोठ्या आवाजात संगीत ऐकणे फक्त सहा महिन्यात तुम्हाला बहिरे बनवू शकते. एक संशोधनात या बाबीचा खुलासा झाला आहे. अॅडिथ कोवान युनिवर्सिटी स्कूल ऑफ सायकॉलजी अॅण्ड सोशल सायन्सचे संशोधक पॉल चांग यांनी आपल्या अहवालात तरूणांसाठी इशारा दिला आहे की मोठ्या आवाजात संगीत ऐकणे पूर्ण आयुष्यासाठी तुम्हाला बहिरे बनवू शकते.

चांग यांनी वेगवेगळ्या वयोगटातील तीन समुहात संशोधन केले. चांगने हे जाणण्याचा प्रयत्न केला की लोक किती मर्यादेपर्यंत मोठ्या आवाजात संगीत ऐकतात. तसेच या लोकांना याचा दुष्परिणाम माहित आहे की नाही.यात असे आढळले की, १२ ते १७ वर्षादरम्यान ५०.६ टक्के किशोर  व्यक्तिगत हेडफोनने संगीत ऐकतात. १८ ते २५ वर्षाचे ८७.२ टक्के लोक संगीत कार्यक्रमानंतर वाजणार्‍या कानासह घरी परततात.

इतकेच नव्हे, ६६.३ टक्के किशोर कोणत्याही प्रकारची हीयरिंग प्रोटेक्शन लावत नाहीत. चांग यांच्या मतानुसार तरूण खुप सामाजिक असतात आणि ऐकण्याची शक्ती विस्कळीत होणे त्यांच्या सामाजिक स्थितीचा आनंद घेण्यावर विपरीत प्रभाव टाकू शकते.

Leave a Comment