मुलीला सोबत घेऊन केले ऐश्वर्याने शॉपिंग

गेल्या काही दिवसापासून बच्चन परिवारातील अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या हिला पाहण्याची उत्सुकता सर्वाना लागून रहिली आहे. ती दिसायला कशी असेल कुणासारखी ती दिसत असेल म्हणजेच अभिषेक की ऐश्वर्यासारखी यावरून सध्या त्यांचे चाहते वेगवेगळे अंदाज बांधत आहेत.

सध्या ऐश्वर्या ही लंडनला गेली आहे. त्याठिकाणच्या एका प्रसिद्ध हॉटेलचे उद्घाटन तिच्या हस्ते  नुकतेच झाले. याठीकाणी एका प्रसिद्ध मॉल मध्ये ती शॉपिंगसाठी गेली होती. ऐश्वर्याने  आराध्यालाही सोबत घेतले होते. त्यठिकाणी ऐश्वर्याने तिच्यासाठी काही उच्च प्रतीचे ब्रन्डेड कपडे खरेदी  केले. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी बच्चन परिवाराची सून व नात आली आहे ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने त्या दोघीना पाहण्यासाठी मॉल मध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली.

ऐश्वर्याने आराध्याला कोणाची नजर लागू नये याची काळजी पूर्वीच घेतली होती. तिने आराध्याला कोणी ही पाहू नये म्हणून कापडात चांगल्या पद्धतीने गुंडाळले होते. त्यामुळे त्या ठिकाणी आराध्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची मात्र घोर निराशा झाली. गेल्या काही दिवसापासून ऐश्वर्या जाड झाली  म्हणणाऱ्या टीकाकाराचे तोंड ऐश्वर्याने काही दिवसातच तिची जाडी कमी करून मात्र बंद केले आहे.

Leave a Comment