फेसबुक विरोधातील याचिकांच्या सुनावणीवर याचिका दाखल करणार

न्युयॉर्क – फेसबुक स्वतःविरूद्ध शेअरधारकांच्या वेगवगेळ्या याचिकांवर एकत्र सुनावणी करण्याबाबत याचिका दाखल करण्यास तयार आहे. न्यूयॉर्क टाइम्सने सूत्राच्या हवाल्याने सांगितले, की फेसबुक सोशल नेटवकिंर्ग कंपनीने स्वतःविरूद्ध शेअरधारकांनी दाखल  केलेल्या सर्व खटल्यावर एकत्र सुनावणी करण्यासाठी याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.

फेसबुकविरूद्ध ३० गुन्हे नोंदवलेले गेले असून यापैकी बहुतांश प्रकरणे न्यूयॉर्क व कॅलिफोर्नियात नोंदवलेली आहेत. वृत्तपत्राने पुढे म्हटले की, कंपनीचा आयपीओ खुप गोंधळ सुरू असताना १८ मेला आला होता परंतु याचे प्रदर्शन निराशाजनक राहिले.सूचीबद्ध असल्यापासून फेसबुकचे शेअर आपल्या उत्पादन मूल्याने २५ टक्के घसरलेले आहे. कंपनीने आपल्या शेअरचे उत्पादन मूल्य ३८ डॉलर प्रती शेअर निश्चित केले होते.

Leave a Comment