कोकाकोलाचे ६० वर्षानंतर म्यानमार मध्ये पुनरागमन

यांगुन दि.१५- कोलाकोलाचे ६० वर्षानंतर म्यानमार मध्ये पुनरागमन होत असून म्यानमार विरूद्ध अमेरिकन निर्बंधानंतर कोलाकोलाने तेथील आपला व्यापार गुंडाळला होता.

अमेरिकन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार म्यानमार मध्ये लोकशाही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भांडवल गुंतवणुकवरील निर्बंध हटवण्यात आले. दुसरीकडे कोकाकोलाने म्हटले की, जसे अमेरिकन सरकारकडून म्यानमार मध्ये काम करण्याचे लायसेंस मिळेल,  त्यावेळी आपला व्यापार तेथे सुरू करेल.

म्यानमार जगातील त्या तीन देशापैकी एक आहे जेथे कोलाकोला व्यापार करत नाही. सॉफ्ट ड्रिंक्स बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी कोकाकोलाने क्यूबामध्ये क्रांती झाल्यानंतर देश सोडला होता. कारण फिडेल कास्त्रो सरकारने खासगी संपत्ती जप्त करणे सुरू केले होते. कोका-कोलाने कधीही उत्तर कोरियात जाण्याचा प्रयत्न केलेला नाही.

कोका-कोला तर्फे असे सांगण्यात आले आहे की, कंपनी बर्मात काम सुरू करताना प्रारंभी शेजारील देशातून उत्पादन आयात करेल.

Leave a Comment