एमटीएनएल मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी

mtnl

मुंबई आणि दिल्लीत मुख्यत्वे व्यवहार करणार्‍या महानगर टेलिफोन निगम लि. या केंद्र सरकारचा अंगिकृत व्यवसाय असलेल्या महामंडळात सीनियर मॅनेजमेंट ट्रेनीची भरती होत आहे. ही भरती दोन विभागांत होईल. टेलिकॉम आणि मार्केटिंग. टेलिकॉम विभागात ३० तर मार्केटिंग विभागात १० जागा आहेत.  अपेक्षित उमेदवार बी.ई. किचा बी.टी.असावा. त्याची ही पदवी टेलिकम्युनिकेशन किवा काम्प्युटर सायन्समधील असावी. तसेच दुसर्‍या १० जागांसाठीचे उमेदवार एमबीए असावेत. मार्केटिंग हा  स्पशेल विषय घेऊन ही पदवी मिळवली असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

ही पदे सीनीयर ट्रेनीची असल्यामुळे उमेदवारांना अनुभव असण्याची गरज आहे. वयोमर्यादा ३० वर्षे आहे. मागासवर्गीय आणि राखीव पदांना पात्र असणार्‍या उमेदवारांसाठी ती नियमाप्रमाणे शिथिलक्षम आहे.इंटरनल अर्जदारांना ही मर्यादा  ४० वर्षे आहे. वेतन श्रेणी २९१०० ते ५४५०० अशी आहे. तीन वर्षांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत ही वेतनश्रेणी दिली जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सीनियर मॅनेजर म्हणून नेमण्यात येईल आणि या काळात त्यांना ३२९०० ते ५८००० ही वेतनश्रेणी दिली जाईल. पात्र व्यक्तींना तीन तासांची पात्रता परीक्षा द्यावी लागेल.  मॅनेजमेंट अप्टीट्यूड, काँजीटिव्ह अेबिलीटी, प्रोफेशनल नॉलेज असे तीन पेपर असतील. पर्यायवाची प्रश्न पत्रिका असेल.  ४५० मार्कांच्या या परीक्षेत १५० प्रश्न विचारले जातील. या परीक्षेचा अभ्यासक्रम वेबसाईटवर उपलब्ध होईल. या परीक्षेत पास होणारांना तोंडी मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि तोंडी परीक्षा घेतली जाईल. या दोन्ही परीक्षांत मिळालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या नियमानुसार तीन वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षणानंतर त्यांची भारतात कोठेही नियुक्ती होऊ शकेल.

या पदांतल्या काही जागा शासकीय नियमांनुसार आरक्षित आहेत याची उमेदवारांनी नोंद घेतली पाहिजे. जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागेल. परीक्षेचे आणि मुलाखतीचे केंद्र कंपनी ठरवील आणि कोणत्याही स्थितीत त्यात बदल होणार नाही. या दोन्हींसाठी उमेदवारांना स्वखर्चाने यावे लागेल. विहित रकमेचा  डिमांड ड्राफ्ट जोडलेला आणि पूर्ण भरलेला अर्ज पोस्ट बॉक्स नंबर  ७०४९, नवी दिल्ली ११०००२ या पत्त्यावर साध्या पोस्टाने पाठवावा. परीक्षेचा अभ्यासक्रम www.mtnl.net.in या वेब साईटवर उपलब्ध होईल तर उमेदवारी अर्जही याच संकेतस्थळा वरून डाऊन लोड करता येतील. अर्जासोबत एक हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जोडावा लागेल. मागासवर्गींय आणि आरक्षित जागांवरील उमेदवारांना या रकमेत ५०० रुपये सूट देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक तपशीलासाठी या पदांसाठीची जाहीरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. २६ नोव्हेंबरच्या अंकात पहावी.  जाहीरात नीट वाचून मगच अर्ज बारकाईने भरावा. अर्ज बिनचुक भरलेला असला पाहिजे. देशात दूरसंचार क्षेत्र किती विकसित होत आहे याची सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे ही किती मोठी संधी आहे हे सांगण्याची गरज नाही.