
एकेकाळी दबंग व बॉडीगार्ड असलेला सलमान खान आता हनुमानची भूमिका साकारणार आहे. आगामी काळात चित्रपट निर्माता उरू पटेल रामायणावर आधारित असलेल्या एका हॉलीवूडच्या चित्रपटची निर्मिती करीत आहे. यामध्ये सलमान खान आता हनुमानची भूमिका करणार आहे. या चित्रपटातील सलमानची भूमिका सुपर हिरोची आहे. तो या चित्रपटात पहाड आणि गगनचुबी इमारतीवर चढून सीतेचा शोध घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
सुरवातीच्या काळात हनुमानची भूमिका अमीर खानने करावी यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र त्याने नकार दर्शविल्याने या भूमिका आता सलमान खान साकारणार आहे. या चित्रपटात रामाची भूमिका स्पीड या चित्रपटचा नायक कीनू रीवस हा करत आहे. तर रावणाची भूमिका द डार्क नाईट या चित्रपटचा अभिनेता गरी ओल्ड्मान याने साकारावी म्हणून त्याचाशी संपर्क साधण्यात आला आहे.
सीतेची भूमिका अभिनेत्री शिल्पा शेट्टी करणार होती मात्र नंतर तिने ही भूमिका करण्यास नकार दर्शविल आहे. आता नव्याने सीतेचा शोध घेणे सुरु आहे. या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षी होणार आहे.