नोकियाची नोकर कपातीची घोषणा

नवी दिल्ली दि.१५- मोबाईल हँडसेट बाजारपेठेवर अधिराज्य गाजविणार्‍या आघाडीच्या नोकिया कंपनीने २०१३ सालच्या अखेरपर्यंत त्यांच्या जगभरातील कंपन्यांतून १० हजार नोकर कपात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने कांही युनिटस बंद करण्याचाही निर्णय घेतला असून त्यात जर्मनी आणि कॅनडा यातील संशोधन केंद्रे तसेच फिनलंडच्या  सालो येथील युनिटचा समावेश आहे.

नोकर्‍यात कपात करताना त्या त्या देशांच्या कायद्यानुसारच ही कपात केली जाईल असे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगर्‍यात आले आहे.तसेच नोकर कपात झाली तरी कंपनी विपणन आणि विक्री वाढीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. कंपनीच्या व्यवस्थापनातही बदलाचे संकेत कंपनीकडून देण्यात आले आहेत.

Leave a Comment