
नवी दिल्ली/ वॉशिंग्टन दि.१५- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी परस्पर हितसंबंधाबाबत नुकतीच फोनवरून चर्चा केली असल्याचे समजते. यात मुख्यत्वे जागतिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांनी करण्याचे प्रयत्न यावरच भर होता.युरोझोनमुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून बाहेर पडण्यासाठी योजावयाचे उपाय यावरही चर्चा करण्यात आली.