
नवी दिल्ली , १४ – देशाच्या सर्वोच्च पदाच्या अर्थात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरून एकीकडे यूपीए अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.