
नवी दिल्ली दि.१५- मोबाईल हँडसेट बाजारपेठेवर अधिराज्य गाजविणार्या आघाडीच्या नोकिया कंपनीने २०१३ सालच्या अखेरपर्यंत त्यांच्या जगभरातील कंपन्यांतून १० हजार नोकर कपात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने कांही युनिटस बंद करण्याचाही निर्णय घेतला असून त्यात जर्मनी आणि कॅनडा यातील संशोधन केंद्रे तसेच फिनलंडच्या सालो येथील युनिटचा समावेश आहे.