मोदींवर संघ परिवार नाराज

गेल्या काही दिवसापासून भाजपमधील गृहकलह मिटण्याचे नाव घेत नाही असे दिसत आहे. संजय जोशी यांच्या राजीनाम्यावरून भाजपमधील अनेक नेतेमंडळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज आहेत. या यादीत दिवसेदिवस भर पडत आहे. सध्या मोदी यांनी संजय जोशीना जी वागणुक दिली आहे त्यावरून संघ परिवार नाराज आहे.

काही दिवसापुर्वी भाजप कार्यकारणीच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली संजय जोशी यांचा राजीनामा घेतला होता. एवढी अपमानास्पद वागणूक देवूनही संजय जोशी यानी एक शब्दही काढला नाही. संघाचे मुखपत्र असलेल्या कमळसंदेश यामधून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी कोणत्याच नेत्यांनी स्वताला पक्षापेक्षा मोठे समजू नये असा इशारा दिला आहे. वर्षअखेरीस गुजरात विधानसभेची निवडणूक होत आहे त्यासोबतच पुढील महिन्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरी यांची फेरनिवड होणार आहे. त्यामुळे या झालेल्या नाटकाबाबत आताच काही मत व्यक्त केले जाणार नाही.

गुजरातच्या निवडणुकीनंतर परत संजय जोशी यांना कार्याकरीणीत स्थान देण्यात यावे यासाठी संघ आगामी काळात प्रयत्न करणार आहे. पुढील वर्षी मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील निवडणूक होणार आहे त्यामुळे संजय जोशीची या निवडणुकीतील भूमिका महत्वाची ठरणार आहे. याशिवाय भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे सुद्धा मोदी यांच्या याप्रकारामुळे नाराज आहेत. जोशीना परत कार्यकारिणीत घेतल्यानंतर पक्षातील कलह काही अंशी मिटेल असे वाटते

Leave a Comment