पावसातील सिंधुदुर्ग जिल्हयाचे दर्शन घडविणार ‘सिंधुदुर्ग गाईड‘

sindhudurg

मुंबई, दि. १३ – पावसाळयात सिंधदुर्गात जाणार्‍या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात पर्यटनासाठी जाणार्‍यांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी व पावसाळी कोकण त्यांना चांगल्या प्रकारे पाहता यावे यासाठी ‘सिंधुदुर्ग गाईड‘ ही संस्था सज्ज झाली आहे.
sindhudurg-1
‘सिंधुदुर्ग गाईड‘ ही एक संकल्पना ‘स्वाभिमान‘ चे अध्यक्ष नितेश नारायण राणे यांनी राबविण्यास सुरूवात केली आहे. यानुसार जिल्हयातील ३० तरूणांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. लवकरच यात आणखी १० तरूणांना असे प्रशिक्षण दिले जाईल. या गाईडना जिल्हयातील पर्यटन स्थळांचा इतिहास, पावसाळयातील खास ठिकाणे, पावसाळयात घ्यावयाची खबरदारी, हॉटेल्स, निवास-न्याहारी योजनेतील ठिकाणे; तसेच पर्यटकांचे आदरातिथ्य कसे करावे यात पारंगत करण्यात आले आहे.
sindhudurg2
सिंधुदुर्ग जिल्हयात मालवण किल्ला, विजयदुर्गचा किल्ला, ओझर येथील ब्रहमानंद स्वामींची समाधी, कुणकेश्वर मंदिर, पांडवकालीन मंदिर, देवबाग-निवती-भोगवे-वेंगुर्ला हे समुद्रकिनारे, आंबोली धबधबा अशी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. कणकवली येथे ‘सिंधुदुर्ग गाईड‘ चे कार्यालय सुरू करण्यात आले असून जिल्हयातील ९० टक्के हॉटेलमध्ये यासंदर्भात माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment