हेडली व राणाच्या चौकशीसाठी भारताचे प्रयत्न

वॉशिंग्टन, १५ –  मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर कठोर शिक्षा करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली आणि त्याचा साथिदार तहव्वूर राणा यांच्या चौकशीची परवानगी मिळावी, अशी मागणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी अमेरिकेकडे केली आहे.

भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय सहकार्यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांची गुरुवारी चर्चा झाली. यावेळी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणाच्या चौकशीची भारताला परवानगी मिळावी, यावर चर्चा करण्यात आल्याचे तसेच त्याला अमेरिकेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी बैठकीनंतर सांगितले.
क्लिंटन म्हणाल्या, की दहशतवाद आणि इतर विषयांवरील महत्त्वपूर्ण माहितीचे भारत आणि अमेरिकेदरम्यान आदान-प्रदान सुरू आहे. माहितीचे आदान-प्रदान करणे हे आमचे धोरण आहे. याबाबत मला अधिक विस्ताराने सांगायचे नाही. परंतु, दोन्ही देशांमधील माहितीचे आदान-प्रदान अधिक व्यापक झाले आहे.

भारत आणि अमेरिकेदरम्यान आदान-प्रदान सुरू आहे. माहितीचे आदान-प्रदान करणे हे आमचे धोरण आहे. दोन्ही देशांमधील माहितीचे आदान-प्रदान अधिक व्यापक झाल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री क्लिंटन यांनी सांगितले.

Leave a Comment