कहानी चित्रपट हिट झाला आणि या दिग्दर्शक सुजय घोष याचेही नाव झाले. सध्या जरी तो प्रसिद्धीपासून दूर असला तरी, त्याचा पुढील प्रोजेक्ट काय असणार आहे? या प्रश्नाने तो हैराण झाला आहे. या प्रश्नाने कंटाळून जाऊन शेवटी सुजयने आपल्या नविन चित्रपटाचे नाव ` बदला’ जाहीर करून टाकले.
अमिताभ बच्चन, नसिरुद्दीन शाह आणि विद्या बालन, अशी तगडी स्टारकास्ट यामध्ये असणार आहे. सुजय घोष याने क्विस्टरवर जाहीर केले आहे की, जी स्क्रिप्ट मी खासकरून सरांसाठी लिहीत आहे, तिचे नाव आहे बदला. ही कथा जर चांगली लिहून झाली, तर त्यात सर आणि नसिरुद्दीन शाह आणि विद्या बालन असतील.
हा चित्रपट म्हणजे कहानीचा सिक्वल असेल, असे मत काही जण व्यक्त करीत आहेत; परंतु त्यावर सुजयने स्पष्टीकरण दिले आहे की, बदला हा कहानीचा सिक्वल नाही. ही एक पूर्णपणे वेगळी कथा आहे.