सायना इंडोनेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली, १५ –  दोनवेळा चॅम्पियन राहिलेल्या सायना नेहवालने जकार्ता येथे इंडोनेशियाई सुपर सीरीज प्रीमियरमध्ये इंडोनेशियाच्या एप्रिला युस्वांदरी हिचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायनाने २००९ आणि २०१० मध्ये सलग दोन वेळा किताब जिंकला होता. सायनाने महिला एकेरी स्पर्धेत तब्बल एक तास चाललेल्या सामन्यात एप्रिलाचा २१-१७, १४-२१, २१-१३ असा पराभव केला.

सायना गेल्या सत्रात उपविजेती राहिली आहे. तिचा सामना चीनच्या शिजियान वांगशी होईल. वांगने इंडानेशियाच्या जुआन जीयूचा २१-१२, २१-११ ने पराभव केला. शिजियानविरूद्ध सायनाची कामगिरी २-१ अशी आहे. सायनाने मार्चमध्ये स्विस ओपन ग्रांप्री गोल्डमध्ये वांगला पराभूत करून मोसमातील पहिले विजेतेपद पटकावले होते.

Leave a Comment