महिंद्रच्या एसयूव्ही ५०० ला प्रचंड प्रतिसाद

मुंबई दि.१४- भारतातील एसयूव्ही कार सेगमेंटमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या महिंद्र अॅन्ड महिंद्रच्या एसयूव्ही ५०० ला बुकींग ओपन होऊन केवळ दोन दिवस होत असतानाच प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या दोन दिवसांत तब्बल ७२०० गाड्यांचे बुकींग झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

कंपनीचे कार्यकारी अधिकारी (वाहन विभाग) प्रवीण शाह या विषयी अधिक माहिती देताना म्हणाले की भारतात एसयुव्हीचे बुकींग ८ जूनपासून सुरू झाले आणि आम्हाला ग्राहकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. याबद्दल ग्राहकांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. देशभरात एसयूव्ही ५०० च्या वितरणासाठी १०० वितरक नेमण्यात आले आहेत.

एसयूव्ही ५०० ने आत्तापर्यंत २२ बक्षिसे मिळविली असून त्यात कार ऑफ द इयर, एसयूव्ही ऑफ द इयर, व्ह्यूअर्स चॉईस, बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी कार, यांचाही समावेश आहे. तसेच या एसयूव्ही ५०० ने डेझर्ट स्टॉर्म, डेझर्ट डॅश व दक्षिण डेझर्ट या भारतीय रॅलीतूनही प्रथम क्रमांक मिळविला आहे. दक्षिण डेझर्ट रॅलीत पहिला क्रमांक पटकविणारी एसयूव्ही ५०० ही पहिली डिझेल एसयूव्ही आहे.