पेट्रोल होणार स्वस्त, डिझेल महागणार

नवी दिल्ली,  दि. १५ –  यंदा खनिज तेलाचा भाव सर्वात कमी असून, तेल कंपन्या सध्या प्रती बॅरल तेलासाठी ९५.७५ डॉलर मोजत आहेत. परिणामी आता पुन्हा एकदा पेट्रोलचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. पेट्रोल आणि डिझेल दरातील वाढत्या तफावतीमुळे केंद्र सरकार चिंतेत असून, डिझेलची किंमत प्रती लिटरमागे तीन रुपयांनी वाढवण्याच्या विचारात आहे.

खनिज तेलाचा भाव स्थिर राहून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात बदल झाला नाही, तर तेलावर देण्यात येणार्‍या अनुदानातही कपात करण्यात येईल अशी माहिती सरकारी तसेच तेल क्षेत्रातील सूत्रांनी दिली.

डिझेल दरवाढची शक्यता व्यक्त केली जात असली ज्या मंत्री समूह दरवाढीचा निर्णय घेणार आहे. या समूहाची अद्याप बैठक झालेली नाही. सध्या मुंबईत डिझेलची किंमत ४५.९९ रुपये-लिटर असून ७६.४५ रुपये-लिटर लिटर या भावात मिळणार्‍या पेट्रोलपेक्षा डिझेल ७४ टक्क्यांनी स्वस्त आहे. येत्या १६ जून रोजी पेट्रोलचे दर कमी करण्यात आले तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील फरक कमी होऊ शकतो, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलची किंमत कमी झाल्याने तेल कंपन्या, पेट्रोलचा दर तीन रुपये प्रती लिटरने कमी करु शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. कार उत्पादक कंपन्यानी डिझेल गाड्यांवर अतिरिक्त कर लावण्यास विरोध दर्शवला आहे. मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरवाड्यात प्रती लिटर पेट्रोलमागे तेल कंपन्यांना १२.५३ रुपये तोटा होत होता. मात्र अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाची किंमत कमी झाल्याने हा तोटा १० रुपयाहूनही कमी होत आहे. मे महिन्याच्या दुसर्‍या पंधराठवड्यात तेलाच्या एका बॅरलची किंमत १०५.५७ डॉलर इतकी होती. काही महिन्यांकरीता खनिज तेलाची किंमत अंदाजे प्रती बॅरल ९८ डॉलर राहण्याची शक्यता असल्याची माहिती तेल कंपनीच्या एका अधिकार्‍यांने दिली. हा दर मागील वर्षाच्या दरापेक्षा ७.५ डॉलरने कमी आहे.

Leave a Comment