
इस्लामाबाद दि.१४- गुरूवारी पहाटे अमेरिकेने उत्तर वझिरीस्तानमधील मीरणशाह शहराच्या बाजारात एका इमारतीवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात तीन दहशतवादी ठार झाल्याचे पाकिस्तानी अधिकार्यांनी सांगितले आहे. एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार पहाटेच्या अंधारात केल्या गेलेल्या या हल्ल्यात बाजारातील ही इमारत पूर्ण उध्वस्त झाली असून आसपासच्या इमारती आणि हॉटेल्सचीही पडझड झाली आहे. या हल्ल्यानंतर तालिबानी गटाच्या कांही लोकांनी या इमारतीच्या ढिगार्यातून ठार झालेल्यांची प्रेते काढून नेली आहेत. या इमारतीवर दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती.