राज्यातील तीन जिल्ह्यात होणार मोबाईल आयटीआय

भंडारा, दि.१२ – मोबाईल रुग्णवाहिकेच्या धर्तीवर राज्यातील आदिवासी तथा नक्षलग्रस्त तीन जिल्ह्यात येत्या शैक्षणिक सत्रापासून मोबाईल आयटीआय सुरु करण्याचा निर्णय तंत्रशिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यात गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याचा प्रायोगिक तत्त्वावर निवड केल्याची माहिती आहे. देशात अतिभागास जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची नोंद आहे. नक्षलग्रस्त कारवायांवर उपाययोजनेकरिता तथा १८ ते २० वर्षाच्या युवकांना तंत्रशिक्षण मिळून स्वयंरोजगार तथा हाताला हक्काचे काम मिळावे. याकरिता तंत्रशिक्षण आपल्या गावी या योजनेची महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे.

संपूर्ण जिल्ह्यात ही मोबाईल आयटीआय फिरणार आहे. एका तालुक्यात निदान आठ दिवस ही मोबाईल आयटीआय दररोज मुक्काम ठोकणार आहे. यात मोबाईल आयटीआयप्रमाणे दोन ते तीन ट्रेडचे प्रशिक्षण देण्यात येईल. एका मोठ्या ट्रकवरील ही मोबाईल आयटीआय सर्व सुविधांनी युक्त असेल. प्रशिक्षित शासकीय आयटीआयच्या शिक्षकांची नियुक्ती या मोबाईल आयटीआयमध्ये करण्यात आली आहे.

Leave a Comment